महाराष्ट्र
ब्रेकिंग! दहा लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

- लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र झाल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आधीच दिली आहे.
- तर आता दहा लाख महिलांना अपात्र करण्यात येणार आहे. इन्कम टॅक्स खात्याच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची तपासणी करण्यात येणार आहे. अपात्रतेच्या निकषांनुसार आयकर विभागाच्या माध्यमातून खात्याची तपासणी करून महिलांना अपात्र केले जाणार आहे. दुसरीकडे राज्य सरकार या पाच लाख लाडक्या बहिणींकडून दिलेले पैसे परत घेण्याची तयारी सुरू केली आहे ? याबाबत महायुती सरकारमधील काही मंत्रींनी सुद्धा अपात्र बहिणींचे पैसे परत घेण्यासंदर्भातील चर्चांना अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींची नावे कमी करण्यात आले आहे असे सांगितले आहे.