देश - विदेश
वाहनधारकांसाठी खुशखबर!

- संपूर्ण देशभरातील वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. देशभरात आता समान टोल आकारला जाणार असून यामुळे रस्ते वाहतूक मंत्रालय एकसमान टोल धोरणावर काम करत आहेत. येत्या काळात देशभरात समान टोल आकारला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासी व वाहनधारकांना दिलासा मिळणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
- गडकरी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, आम्ही एकसमान टोल धोरणावर काम करत आहोत. यामुळे प्रवाशांना येणाऱ्या समस्या दूर होतील. उच्च टोल शुल्क आणि खराब रस्त्यांबद्दलच्या तक्रारींमुळे राष्ट्रीय महामार्ग प्रवाशांमध्ये वाढता असंतोष या विषयावर विचारलेल्या प्रश्नाला गडकरी उत्तर देत होते. ते म्हणाले की, मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर एक निर्बाध ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम आधारित टोल संकलन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सोशल मीडियावरील प्रवाशांच्या तक्रारी अतिशय गांभीर्याने घेत आहे आणि संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करत आहे.