महाराष्ट्र

ब्रेकिंग! वर्षभरात धनंजय मुंडेंचे पावणे तीन कोटींचे पाच घोटाळे

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेत बोलताना दमानिया म्हणाल्या की, एक कृषीमंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो, हे मी पुराव्यानिशी सांगणार असल्याचे सांगत वर्षभराच्या काळात मुंडेंनी पावणे तीन कोटींचे पाच घोटाळे केल्याचा गंभीर आरोपही दमानिया यांनी मुंडेंवर केला.

यावेळी थेट पुरावे दाखवत दमानिया यांनी महायुतीच्या नेत्यांवर वार केला. नॅनो युरिया, नॅनो डीपीएच्या खरेदीत कृषीमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढले गेले, त्यात एक बॉटल 220 रूपयांना घेतली, तिची किंमत 92 रूपये होती. हा घोटाळा 88 कोटींचा आहे. बॅटरी स्प्रेयरवर बोलताना दमानिया म्हणाल्या की, तो आताच्या घटकेला 2400 रूपयाला घेतला जातोय, तर 2900 रूपयांना विकला जातोय. याचे टेंडर कृषीमंत्र्यांनी काढले, ते 3600 रूपयांना आहे. आपले तत्कालिन कृषीमंत्री यांनी किती पटीने गोष्टी खरेदी केल्या ते पहा. 2 लाख 36 स्पेअर बॅटरी खरेदी केल्या 3000 रूपयाची एक बॅटरी आहे. प्रत्येकी 1275 रूपये जास्त किमतीने हे खरेदी केले. पत्रकार परिषदेमध्ये पुरावे दाखवत दमानिया यांनी मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले.

Related Articles

Back to top button