क्राईम

35 वर्षीय सीमा, 29 वर्षीय राहुल, प्रेमप्रकरण, पैसा आणि लग्नाचा तगादा

  • भर दिवसा एका महिलेची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथ शहरात घडली. शहरातील हुतात्मा चौकाकडून भीमनगरकडे जाणाऱ्या साईबाबा मंदिराजवळ ही हत्या झाली. हत्या झालेल्या महिलेचे नाव सीमा कांबळे असल्याचे समजत आहेत. विशेष म्हणजे हत्या झाली, त्यावेळी तिथे काही जण हजर होते. त्यांनी डोळ्यादेखत लाईव्ह हत्या पाहिली. त्यांनी हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही हल्लोखोराने धमकावले.
  • अंबरनाथच्या बारकूपाडा भोईर चाळ परिसरात शेजारी राहणारे सीमा आणि राहुल भिंगारकर यांची मैत्री होती. सीमाचा नवरा तिला सोडून गेल्याने ती 13 वर्षांच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. बेबी सिटिंगमध्ये काम करणाऱ्या सीमाने राहुल याच्याशी असलेल्या मैत्रीतून त्याला अडीच लाख रुपये उसने दिले होते. मात्र ते पैसे तो तिला परत करू शकत नव्हता. त्यावर तिने माझ्याशी लग्न कर किंवा माझे पैसे परत कर, असा तगादा लावला होता.
  • तसेच लग्न केले नाही तर बलात्काराची केस करण्याची धमकी तिने राहुलला दिली होती. या दुहेरी कात्रीत सापडलेल्या राहुलने अखेर सीमाचा काटा काढायचे ठरवले. सीमाला अंबरनाथ स्टेशनच्या भीमनगर परिसरातील साईबाबा मंदिराशेजारच्या पायऱ्यांवर तो भेटला. तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि राहुलने सीमावर चाकूने सपासप अनेक वार करत तिथून पळ काढला. यानंतर तो स्वतः जाऊन पोलिसांसमोर हजर झाला. दुसरीकडे गंभीर जखमी अवस्थेतील सीमाला लोकांनी उचलून जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र तिचा तिथे मृत्यू झाला. 

Related Articles

Back to top button