क्राईम
अनमोल बिश्नोई…व्हिडिओ कॉल अन् बाबा सिद्दीकींची हत्या

- राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सिद्दीकी यांच्या हत्येची शेवटीची प्लॅनिंग मुंबईतील एका हॉटेलमध्ये करण्यात आली होती असा खुलासा मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे.
- मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2024 मध्ये मुंबईतील कळंबोली येथील एका हॉटेलमध्ये सिद्दीकी यांच्या हत्येची शेवटीची प्लॅनिंग करण्यात आली होती आणि या बैठकीत पोर्तुगिजमधून अनमोल बिश्रोई देखील व्हिडीओ कॉलवर होता. आरोपपत्रानुसार,आरोपी राम कनोजिया, शुभम लोणकर, नितीन सप्रेसह इतर आरोपी देखील उपस्थित होते. तसेच या बैठकीत कोणत्याही किंमतीत सिद्दीकी यां मारण्याचे आदेश बिश्रोईने दिले होते.
- आरोपी हरीशकुमार निषादनेही आपल्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. निषादच्या जबाबानुसार, आरोपी शुभमने सिद्दीकी हत्येची जबाबदारी त्याला दिली होती.
- हत्येच्या बदल्यात बिश्नोई हरीशकुमारला दहा लाख रुपये देणार होता. निषादने पुढे असा दावा केला की, प्रत्यक्ष गोळीबार शिवा, गुरमेल आणि धर्मराज यांनीच करायचा होता. त्यामुळे त्याला वाटले की तो थेट हत्येत अडकणार नाही. हत्येनंतर निषाद पळून गेला, त्याला त्याच्या गावातून हत्येची माहिती मिळाली.