भर कार्यक्रमात अश्लील कमेंट्स, लोकप्रिय अभिनेत्रीच्या आरोपानंतर…

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान, मल्याळम अभिनेत्री हनी रोज हिच्या तक्रारीवरुन प्रसिद्ध व्यापारी बॉबी चेम्मनूर यांना अटक करण्यात आली आहे. बॉबी यांनी वारंवार अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप हनी हिने केला आहे. हनीने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून केलेल्या पोस्टमध्ये हा आरोप केला आहे.
एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले की, हनीच्या तक्रारीवरुन कारवाई करण्यात आली आहे. चौकशीचा एक भाग म्हणून बॉबी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे.
हनीने तिचा अनुभव शेअर करताना खुलासा केला होता की, बॉबी सतत डबल मीनिंग कमेंट करत होते. इव्हेंटमध्ये तिला फॉलो करत होते. ती सहसा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करते, परंतु या प्रकरणात व्यक्त होण्याची गरज होती. तिला आमंत्रित केलेल्या कार्यक्रमांमध्ये बॉबी हजेरी लावत होता. तसेच सार्वजनिकपणे तिच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करत असे. पोलीस याता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.