बिजनेस

खुशखबर ! सोन्याचा भाव घसरला, चांदीही झाली स्वस्त

  • भारतीय सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली आहे. मात्र, सोन्याचा भाव 71 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढेच आहे. त्याचबरोबर आज चांदीमध्येही बंपर घसरणीची नोंद झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत 71,192 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 80, 882 रुपये प्रति किलो आहे.
    इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 71,931 रुपये प्रति दहा ग्रॅम होता, जो आज 71,192 रुपयांवर घसरला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत.
    सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासली पाहिजे. सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जाते. आज भारतात 22 कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत 65, 212 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याची (999 सोने म्हणूनही ओळखले जाते) प्रति दहा ग्रॅम 71,192 रुपये आहे. त्याचवेळी भारतात एक किलो चांदीची किंमत 80, 882 रुपये आहे. 

Related Articles

Back to top button