प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात पुन्हा एकदा आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. महाकुंभच्या सेक्टर-22 मध्ये आग लागल्याने अनेक टेन्ट जळून खाक झाले आहेत. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली. आग लागण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलिसांकडून भाविकांना शांततेचे आवाहन करण्यात येत असून या घटनेचा तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाकुंभमध्ये लागलेल्या आगीत 15 टेन्ट जळून खाक झाले. आग लागल्याचं कळताच तातडीनं अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्मिशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून टेन्टला लागलेली आग नियंत्रणात आणली.