मनोरंजन
…अखेर छावा चित्रपटातला ‘तो’ वादग्रस्त भाग हटवला

- अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला छावा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरचे सर्वांनीच भरभरून कौतुक केले आहे. पण, यामधल्या नृत्यावर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली. सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर करून चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न असल्याची टीका करण्यात आली. त्यावर राज्य सरकारनेही आक्षेप घेतला होता. अखेर, आता या चित्रपटातील हा वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आला आहे.
- चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळत नृत्य करताना दिसत असल्याबद्दल आक्षेप घेतला जात आहे. काही संघटनांनी याविरोधात आंदोलनही सुरू केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्मात्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. यावर राज्य सरकारचे मंत्री उदय सामंत यांनी भूमिका मांडली.
- ते म्हणाले, मी स्वतः काल निर्माते आणि दिग्दर्शक यांना फोन केला होता. आजची त्यात सकारात्मक बाजू आहे की, नाचण्याचा भाग होता. तो काढून टाकण्यात आला आहे.