राजकीय
ब्रेकिंग! बड्या नेत्याने सोडली ठाकरेंची साथ

- शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला पोखरण्याचे काम सुरू आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन ‘धनुष्यबाण’सह ऑपरेशन ‘टायगर’ राबवण्यात येणार आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते.
- त्यापार्श्वभूमीवर रत्नागिरीतील अनेक ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे आज रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी राजीनामा दिला आहे.
- कदम हे शिवसेनेत 40 वर्षापासून आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतरही कदम यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणे पसंत केले होते. मात्र, आता कदम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. शिवसेनेचे ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव आणि कदम यांच्यात संघर्ष होता. त्यामुळे कदम यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, वैयक्तिक कारणामुळे पद आणि सदस्यत्त्वाचा राजीनामा देत आहे, असे कदम यांनी सांगितले.