सोलापूर
शरद पवारांची तब्येत बिघडली
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त समोर येत असून, पवारांचे नियोजित सर्व दौरे पुढील चार दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहे.
- काल कोल्हापुरातदेखील पत्रकार परिषदेत बोलताना पवारांना सारखा खोकल्याचा त्रास होता होता. त्यानंतर आता त्यांचे सर्व नियोजित दौरे चार दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत.
- पवार यांनी काल कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. तसेच अन्य ते एका कार्यक्रमातही सहभागी झाले होते. त्यावेळी उपस्थित करताना पवारांना सारखा खोकला येत असल्याचे दिसून आले होते. यामुळे त्यांना भाषण करण्यातही व्यत्यय येत होता. तर त्याआधी कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेतही पवारांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळीदेखील त्यांचा आवाजावरून त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे जाणवत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांना माझा घसा खराब आहे, असे म्हणत थांबण्याची विनंती केली होती.