क्राईम
मित्रांनीच केला मित्राचा खून
- बीड जिल्हा गेल्या दीड महिन्यापासून राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. दरम्यान आता पाटोद्यातील एक खून प्रकरण समोर आले आहे. सौरभ भोंडवे या तरुणाची मित्रानेच हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
- या तरुणाचा त्याच्या मित्रांनी खून केला आहे. मात्र तरीही पोलिस तक्रार दाखल करून घेत नसल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे.
- पाटोद्यात मित्रांनीच मित्राचा खून केल्याचा गंभीर आरोप मृत सौरभच्या आईने केला आहे. मित्रांबरोबर सौरभ बाहेर गेला होता. सायंकाळी मी त्याला फोन केला. परंतु त्याच्या मित्रांनी फोन उचलूनही प्रतिसाद दिला नसल्याचे मयत सौरभच्या आईने म्हटले आहे. त्याच्या मित्रांनीच त्याला तलावाच्या पाण्यात बुडवून मारले आहे. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याचा गंभीर आरोप सौरभच्या आईने केला आहे.
- पाटोदा येथे ही घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सौरभ शिवाजी भोंडवे (२८ वर्षीय ) असे आहे. सौरभ हा संभाजी जायभये, गोरख आघाव, आणि सागर जाधव या मित्रांबरोबर बाहेर गेला होता.
- सायंकाळी त्याच्या आईने त्याला फोन केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर हेच मित्र पोलीस स्टेशनला जातात, मात्र तिघे जवाब वेगवेगळा देतात. त्यानंतर दोन दिवसांनी सौरभचे प्रेत प्रचंड शोध घेतल्यावर मिळते. तलावात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. पोलिसांकडून फिर्याद नोंद केली जात नाही. या प्रकरणात पोलीस निरीक्षक अनमोल केदार हे त्यांना म्हणतात एसपींना भेटा, नाहीतर कुठही जा.. असे ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे.