महाराष्ट्र

लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

  • विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेची घोषणा करुन महिलांचे अर्ज मंजूर केले. यातील काही अर्जांमध्ये त्रुटी असूनही पडताळणी न करता त्या महिलांना पैसे देण्यात आले. 
  • मात्र आता निकालानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहेत. तसेच ज्या अर्जांमध्ये त्रुटी आहेत ते अर्ज बाद केले जातील, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे ज्या पात्र महिलांचे अर्ज बाद होतील, त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत, असे बोलले जात आहे.
  • दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली, तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले. आता लाडकी बहीण योजनेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते. 
  • ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यासाठी ही योजना अशीच सुरु राहणार आहे. त्यात अजिबात खंड पडणार नाही. त्यांना दर महिन्याला या योजनेचा हप्ता मिळत राहिल, असे शिंदेंनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Back to top button