राजकीय
ब्रेकिंग! एकनाथ शिंदेंचा नवा दणका
-
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान शिंदेंकडून ठाकरे गटासह विरोधी पक्षांना खिंडार पाडणे सुरु आहे.
-
जालन्यातही ठाकरे गटाचा बडा नेता शिंदे गटाच्या गळाला लागला आहे. तर काँग्रेसच्या ८ माजी नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. या दोन्ही पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. जालन्यात शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठा दणका दिला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. तसेच जालन्यातील ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह बोराडे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.