देश - विदेश
मुंबई 26/11 हल्ल्याच्या मास्टरमाईंडला भारतात आणणार
- मुंबई 26/11 हल्ल्यातील मास्टरमाईंट तहव्वूर हुसेन राणा याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. भारतासाठी हे मोठे यश मानले जात आहे. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राणाच्या प्रत्यार्पणाची भारताने अनेक दिवसांपासून मागणी केली होती. राणावर मुंबईत येऊन रेकी केल्याचा आरोप आहे. यासोबतच त्याच्यावर लष्कर आणि आयएसआयसाठी काम केल्याचाही आरोप आहे.
- राणा सध्या लॉस अँजेलिस येथील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये कोठडीत आहे. 13 नोव्हेंबर 2024 रोजी राणाने प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते, जे 21 जानेवारी रोजी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने फेटाळले. यापूर्वी त्याने सॅन फ्रान्सिस्को न्यायालयात अपील केले होते, जिथे त्याची याचिका फेटाळण्यात आली होती. दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवले जाऊ शकते, असे अमेरिकन न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते.