क्राईम

ब्रेकिंग! वाल्मिक कराड होणार कंगाल

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या प्रकरणात काही आरोपी गजाआड झाले आहेत. त्यांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

तोही सध्या कोठडीत आहे. या प्रकरणात वाल्मिकवर गंभीर आरोप होत आहेत. यातच आता कराडला धक्का देणारी बातमी आली आहे. विशेष तपास पथकाने कराडची पूर्ण मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कराडच्या मालकीच्या सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तांची जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज एसआयटीने दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. 

कराडची नेमकी कुठे आणि किती संपत्ती आहे याची सर्व माहिती एसआयटीने गोळा केली आहे. याचं रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता सील केल्या जातील. 

जर यानुसार कार्यवाही झाली तर कराडसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. यासाठी आता एसआयटीने हालचाली सुरू केल्या आहेत.

वाल्मिकच्या नावावर बीड, पुणे आणि अन्य विविध ठिकाणी जमीन, फ्लॅट अशा मालमत्ता असल्याची माहिती समोर आली होती. त्याची संपत्ती पाहून अनेकांना आश्चर्य वाटत होते.

आता त्याची हीच संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली एसआयटीने सुरू केल्या आहेत. एसआयटीने बीड येथील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे 

Related Articles

Back to top button