सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! विवाहितेचा छळ ; पतीसह सहा जणांना दणका
- सोलापूर (प्रतिनिधी) विवाहिता या सासरी नांदत असताना घरातील मंडळी किरकोळ कारणावरून घालून पाडून बोलून नवीन प्लॉट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये तरच तुला आम्ही नांदवणार असे म्हणून विवाहितेला घरातून हाकलून देऊन तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन आर्थिक छळ केल्याची फिर्याद ऐश्वर्या विशाल साळुंखे (वय-२९, रा.महेश थोबडे नगर, दहिटणे रोड, शेळगी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.
- त्यांच्या फिर्यादीवरून पती विशाल,सासू संगीता (रा. गुरुद्वार कॉलनी रोड, पुणे), शुभांगी पाटील, सुशांत पाटील (रा.रावेत, पुणे), संजय टोणपे, स्वाती टोणपे (रा. लोणी काळभोर, पुणे) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २८ जून २०२३ ते ३० जून २०२४ दरम्यान फिर्यादी यांच्या सासरी पुणे येथे घडली. असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलीस हवालदार साळुंखे हे करीत आहेत.