क्राईम

पोलीस हवालदाराच्या मुलाने त्यांच्याच सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वत:वर झाडली गोळी!

  • राज्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील एका पोलीस हवालदाराच्या मुलाने आत्महत्या केली आहे. वडिलांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडून स्वत: चे आयुष्य संपवले आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. हर्ष म्हस्के (वय २० ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर संतोष म्हस्के असे पोलीस हवालदाराचे नाव आहे. संतोष म्हस्के हे एसपीयू युनिटमध्ये असून एका मोठ्या नेत्याच्या बंदोबस्तासाठी तैनात आहेत. त्यांचा मुलगा हर्ष याने राहत्या घरी आज दुपारी वडिलांनी सुरक्षितपणे ठेवलेली सर्व्हिस रिवॉल्व्हर घेतली आणि स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली. या घटनेमुळे खळबळ उडाली.
  • अलीकडे, संतोष म्हस्के यांनी हर्षला केटीएमची महागडी बाईक घेऊन दिली होती. पण त्यांच्या मुलाने हे कृत्य का केले हे अद्याप समोर येऊ शकले नाही. 

Related Articles

Back to top button