मनोरंजन

महाकुंभतील ‘व्हायरल गर्ल’ मोनालिसाला करायचंय बॉलिवूडवर राज्य

प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याची सुरुवात झाली असून महाकुंभ मेळ्यातून आतापर्यंत अनेकजण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे मध्य प्रदेशातील इंदूरहून महाकुंभात हार विकण्यासाठी आलेली मोनालिसाला. महाकुंभातील ऐश्वर्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोनालिसाला आता अभिनेत्री व्हायचे आहे. तसेच तिला अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता सलमान खानला भेटायचे आहे.

काही दिवसापूर्वी महाकुंभ सोडून गेलेली मोनालिसा आता पुन्हा महाकुंभात परतली आहे. यावेळी ती तिच्यासोबत स्वतःचे यूट्यूब चॅनेल घेऊन आली आहे. एका मुलाखतीमध्ये तिने मनातील भावना व्यक्त करत मला अभिनेत्री व्हायचे आहे आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता सलमानला भेटायची इच्छा व्यक्त केली.

या मुलाखतीमध्ये बोलताना तिने तिच्या मनातील भावना व्यक्त करत तिला सोनाक्षी आवडते आणि आयुष्यात एकदा तरी तिला भेटायचे आहे. तसेच तिला सलमानलाही भेटायचे आहे, असे तिने सांगितले. तसेच तिला बॉलिवूडमध्येही अभिनय करायचा आहे आणि संधी मिळाली तर तिला चित्रपटांमध्येही गाण्याची इच्छा आहे, असे देखील मोनालिसा म्हणाली.

प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात इंदूरहून रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी मोनालिसा आली होती. तिच्या मधुर डोळ्यांनी तिला रातोरात स्टार बनवले. मोनालिसाचे अनेक रिल्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे महाकुंभात ती जिथे जिथे हार विकायला जायची, तिथे तिथे लोक तिच्यासोबत सेल्फी काढत होते. मात्र यामुळे तिच्या कामावर परिणाम होत असल्याने तिच्या पालकांनी तिला इंदूरला परत पाठवले होते. मात्र आता ती पुन्हा एकदा महाकुंभात परतली आहे.

Related Articles

Back to top button