महाराष्ट्र

‘परकी’ बहीण ‘लाडकी’च राहणार; अपात्र महिलांकडून वसुली नाही

  • राज्यात लाडकी बहीण योजनेच्या पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम सरकार राबवणार आहे. अर्जाच्या पडताळणीमध्ये जर महिला अपात्र ठरली तर पैसे परत घेतले जाणार अशी चर्चा सुरू झाली. यावरून विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होत आहे. यावर आता महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सर्वात महत्त्वाचा खुलासा केला आहे.
  • अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. तसेच शासनाने अद्याप कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ परत घेतला नाही, असे तटकरे म्हणाल्या.
  • तटकरेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. या योजनेविषयी बोलताना त्या म्हणाल्या की,
  • वेगवेगळ्या प्रसार माध्यमांतून गैरसमज पसरवले जात आहेत की, लाडकी बहीण योजनेत बदल होणार आहेत. मात्र, एकाही लाडक्या बहिणीचे लाभ किंवा पैसे आम्ही परत घेतलेले नाहीत. तसेच आम्हाला विविध ठिकाणाहून पत्रे येत आहेत की, जे पात्र नाहीत त्यांचा लाभ बंद करायचा आहे. 
  • दररोज पाच – दहा हजार अर्ज येत आहेत. तसेच काही महिला अविवाहित होत्या आणि लाभ घेत होत्या. तर काही महिला इतर राज्यात गेल्या आहेत. त्याच महिला आता आम्हाला योजना बंद करायची आहे असे अर्ज करत आहेत, असे तटकरे म्हणाल्या. 
  • लाडकी बहीण योजनेचे हे पहिला वर्ष असल्याने याबबत गैरसमज पसरवले जात आहे. मात्र, पडताळणी ही नियमित प्रक्रिया आहे, असे सांगत आम्ही एकाही महिलेचा लाभ त्यांच्या इच्छेविना परत मागे घेणार नाही, असे तटकरेंनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button