क्राईम

ब्रेकिंग! कर्नाटक एक्स्प्रेसने अनेकांना चिरडले

  • राज्यात अत्यंत मोठी दुर्घटना घडली आहे. जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. त्यानंतर अनेकांनी एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या. 
  • आग लागल्याची अफवा पसरताच 30 ते 35 जणांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. त्यातच समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसने पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली आहे. यात अनेक जण जखमी झाले असून काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
  • पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे येत असताना हा अपघात घडला आहे. चालकाने अचानक ट्रेनचे ब्रेक दाबले त्यामुळे चाकामधून ठिणग्या उडाल्या, ठिणग्या पाहून प्रवासी घाबरले. 
  • आग लागल्याची अफवा पसरली. आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर 30 ते 35 जणांनी रेल्वेमधून उड्या मारल्या, मात्र याचवेळी समोरून बंगळूरू एक्स्प्रेस येत होती. पुष्कक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या लोकांना या एक्स्प्रेसने चिरडले.
  • या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मात्र मृतांचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही.

Related Articles

Back to top button