क्राईम

लग्न करू नका मित्रांनो…

  • अलीकडे बायकोच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या पुरुषांच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत देखील पत्नी आणि सासरच्यांच्या त्रासाला कंटाळुन एका नवऱ्याने आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. 
  • या आत्महत्येपूर्वी तरूणाने दोन पत्र लिहली होती. यातील एक पत्र आईसाठी तर दुससे पत्र त्याने मित्रासाठी लिहले होते. या पत्रात त्याने तरूणांना लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भारत सरकारकडे कायद्यात बदल करण्याची मागणी केली आहे.
  • दरम्यान मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये ही घटना घडली आहे. बाणगंगा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या नितीन पडियारने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीचा जाचाला कंटाळून त्याने हे टोकाचं पाऊल उचलले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाकडे सुसाईड नोट सापडली आहे. 
  • यामध्ये नितीन यांनी त्यांच्या आत्महत्येसाठी पत्नी वर्षा शर्मा, सासू सीता शर्मा आणि वहिनी मीनाक्षी यांना जबाबदार धरले आहे. त्यामुळे पत्नीच्या छळामुळे तो त्रस्त असल्याने त्याने हे पाऊल उचलले. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.
  • मित्रांना लिहलेल्या पत्रात त्याने लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. सरकारने हुंडा बंदी कायद्यात बदल करावा, महिला त्याचा गैरवापर करत आहेत, असेही त्यांनी सुसाईट नोटमध्ये म्हटले आहे.

Related Articles

Back to top button