राजकीय

ब्रेकिंग! बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच राज्यात मोठा राजकीय भूकंप?

  • राज्यात येत्या 23 तारखेला मोठा राजकीय भूकंप होणार असून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी आमच्या उदयाची नाही तर स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करावी, असा सल्ला शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी विरोधकांनी दिला आहे. तसेच सूर्याचा उदय व्हायचा तो जून 2022 मध्ये झालेला आहे. एकनाथ शिंदेंनी तो ऐतिहासिक निर्णय घेतला. सूर्य हा एकच असतो, दुसरा होत नाही, असेही शेवाळे म्हणाले.
  • अस्वस्थता महायुतीत नाही तर महाविकास आघाडीत आहे. आघाडी स्वार्थासाठी सत्तेसाठी झाली आहे . स्वार्थ निघून जाते, तेव्हा बिघाडी दिसून येत तीच बिघाडी दिसत आहे. अस्तित्व वाचवण्यासाठी आता पक्षांचे प्रमुख हातपाय पसरवत आहेत. आमदारांची नाराजी नाही अशा गोष्टी सर्वच पक्षात असतात. फडणवीस मुख्य नेत्यांशी चर्चा करुन तोडगा काढतील असा, विश्वास शेवाळे यांनी व्यक्त केला.
  • वडेट्टीवार आणि संजय राऊत यांनी शिवेसनेची काळजी करु नये. येत्या 23 तारखेच्या भूकंपासाठी ते अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे 15 तर काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात आहेत. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आमदार, खासदार इच्छुक आहेत, असाही दावा शेवाळे यांनी केला आहे.

Related Articles

Back to top button