क्राईम

सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे ढाबा कनेक्शन

  1. मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तसेच सीआयडी देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे. देशमुखांच्या हत्येचा कट हा एका हॉटेलमध्ये बसून रचल्याची माहिती समोर आली आहे.
  2. देशमुख यांच्या हत्येचा कट सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीने एका हॉटेलमध्ये बसून रचला. यावेळी गावरान चिकनची ऑर्डर दिली होती. तर पाच ते सहा जण जेवायला होते, असे हॉटेल मालकांनी सांगितले. केज – मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावरील नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये या हत्येचा कट रचण्यात आला.
  3. हॉटेलचे मालक म्हणाले, आठ डिसेंबरला आरोपी आले होते. दोन गावरान चिकन हंडी ऑर्डर केली आणि जेवण करून ते गेले. सहा ते सात जण होते. अर्धा ते पाऊण तास ते हॉटेलमध्ये थांबले होते. आम्ही तपास अधिकाऱ्यांना हॉटेलचे सीसीटीव्ही देखील दिले आहे.

Related Articles

Back to top button