महाराष्ट्र

ब्रेकिंग! उद्या महाराष्ट्र बंदची हाक

अलीकडे महिलांच्या अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोनच दिवसापूर्वी झालेल्या बदलापूर घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद पुकारण्यात येणार आहे. सोलापूर शहरातदेखील सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीने या बंदमध्ये सहभागी होण्याचे जनतेला आवाहन केले आहे. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अनेक सेवांवर त्यांचा परिणाम दिसून येईल. राज्यातील एसटी महामंडळ आणि रेल्वे सेवेवर या बंदचा परिणाम दिसू शकतो. मुंबईत लोकल सेवेवर परिणाम दिसण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी बंद दरम्यान एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक झाल्याने नुकसान झाले होते. तर बदलापूरकरांनी आंदोलन करत रेल्वे रोको केला होता. खबरदारी म्हणून या सेवांना राज्यात काही ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे. बंदच्या माध्यमातून विरोधक ताकद दाखवण्याची शक्यता आहे.
हा राजकीय बंद नसल्याचे अगोदरच महाविकास आघाडीने स्पष्ट केले आहे. उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद राहण्याची शक्यता आहे. भाजीपाला मार्केट, इतर दुकाने बंद असतील. दूध विक्री, भाजीपाला विक्री आणि किराणा दुकाने, हॉटेल्स बंद राहण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button