आरोग्य
ब्रेकिंग! महाराष्ट्रातही HMPV व्हायरसचा शिरकाव

- देशात एचएमपीव्ही म्हणजेच ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. महाराष्ट्रातही नागपुरात या विषाणूच्या संसर्गाचे दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. देशात आतापर्यंत सात जणांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने कोविड सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. बेंगळुरू, नागपूर आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन आणि अहमदाबादमध्ये एक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.
- विशेष म्हणजे नागपूर महापालिकेने एम्समध्ये या रुग्णांचे नमुने पुन्हा तपासण्याचा निर्णय निर्णय घेतला होता. दोन्ही मुले बरी झाली आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच चिंता करण्याची गरज नाही. देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क असून काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे नड्डा म्हणाले.