क्राईम
ब्रेकिंग! राज्यात ‘सैराट’ची पुनरावृत्ती

- राज्यात सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. 17 वर्षीय मुलीची 200 फूट डोंगवरून खाली ढकलून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्या चुलत भावानेच हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपीला ताब्यात घेतले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
- नम्रता शेरकर असे मृत मुलीचे नाव आहे. तर ऋषिकेश शेरकर (25 वर्ष) असे भावाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नम्रता अंबड तालुक्यातील शहागड येथील घर सोडून निघून गेली होती. घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीने शहागड पोलिसांना दिली होती.
- चिडलेल्या मुलीची समजूत काढण्यासाठी घरच्यांनी तिला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते. काकाचा मुलगा ऋषिकेश याने नम्रताला गोड बोलून खावडा डोंगरावर नेले आणि तेथून ढकलून दिले. उंच डोंगरावरुन पडल्याने मुलीचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे सर्वांना वाटले. याप्रकरणी पोलिसांकडून सविस्तर तपास सुरु आहे.