हवामान

ब्रेकिंग! राज्यात पुन्हा थंडी परतली

सोलापूर शहर व परिसरात पुन्हा एकदा थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. दरम्यान, उत्तर भारतातील राज्यांमधून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी पुन्हा वेग पकडला आहे. त्यामुळे राज्यातून गायब झालेली थंडी पुन्हा आली आहे.

या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्र गारठला आहे. या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील जिल्ह्यांमधील किमान तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील किमान तापमान अकरा अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. राज्यात पुढील तीन दिवस थंडी कायम राहील, असा अंदाज वर्तवला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत राज्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमनान एक ते तीन अंशाच्या खाली जाण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान दहा अंशाच्या खाली जात असल्याची नोंद झाली आहे. यवतमाळचे तापमान सात अंश सेल्सिअसवर पोहचले आहेत. तर सोलापूर, सांगली, पुणे गोंदिया आणि नगर याठिकाणचे तापमान आठ अंशावर पोहचले आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये दहा ते बारा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

आता थंडी वाढल्यामुळे राज्यात पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या आहेत. थंडी वाढल्यामुळे नागरिक जाड कपडे घालताना दिसत आहेत. सध्या राज्यात सकाळी गारठा आणि दिवसा कडाक्याचे ऊन पाहायला मिळत आहे. 

Related Articles

Back to top button