सोलापूर

पंतप्रधान मोदी चोर आहेत: आक्षेपार्ह व्यक्तव्य, राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांच्या विरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल

भाजप सोलापूर शहराच्यावतीने पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरुद्ध सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोलापूर येथील एका सभेस उद्देशून भाषण करीत असताना हेतू पुरस्सर, देशाचे पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने “मोदी हे चोर आहेत त्यांनी अमीन सायनी यांची शब्द चोरलेले आहेत” अश्या शब्दात अमोल मिटकरी यांनी जनतेचा प्रतिनिधी असल्याचे भान न ठेवता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलीन करण्या हेतूने बद्दल आक्षेपार्ह करीत समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केलेला आहे त्याने सामाजिक भावना चेतवण्याचे हेतू परस्पर व्यक्तव्य केलेला आहे.
मिटकरींच्या त्या व्यक्त्व्यावरून भावना दुखावल्या आहेत म्हणून सदरची तक्रार दिली आहे. अमोल मिटकरी यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम १५३ अ,५००,५०५(२) प्रमाणे गुन्हा नोंदवून योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष विक्रमजी देशमुख, उपाध्यक्ष विजयाताई  वड्डेपल्ली,  शहर चिटणीस अनिल कंदलगी, नागेश सरगम, युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश साखरे, प्रेम भोगडे,  अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव संगेपान, मध्य पूर्व मंडल अध्यक्ष सुनील गौडगाव, उपाध्यक्ष मनोज कलशेट्टी, सरचिटणीस गिरीश बत्तूल, सोशल मीडिया प्रमुख योगेश गिराम आदी उपस्थित होते. 

Related Articles

Back to top button