राजकीय
ब्रेकिंग! शरद पवारांनी फिरवला डाव

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली आहे. आता सोलापूरसह अन्य भागात उद्या मतदान होणार आहे. तर शनिवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मोहोळमधील बंडखोरी मोडून काढण्यात यश आले आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना बंडखोर उमेदवार संजय क्षीरसागर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी क्षीरसागर यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. क्षीरसागर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्यांनी खरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता मोहोळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद वाढली आहे.



