राजकीय

ब्रेकिंग! विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई

भाजपचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेदरम्यान पत्रकार परिषद घेतल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळींज पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तावडे हे हॉटेल विवांतमध्ये पैसे वाटत असल्याची माहिती समजल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली आणि हा सगळा प्रकार समोर आला. त्यावेळी भाजप आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत तावडेंना घेराव घातला आणि जाब विचारण्यास सुरुवात झाली.

बविआचे प्रमुख, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी यादरम्यान मोठा गौप्यस्फोट केला. ठाकूर यांनी सांगितले की, तावडे हे आज पैसे वाटण्यासाठी येत असल्याची माहिती मला मिळाली होती. ही माहिती मला भाजप नेत्याने दिली होती. त्यानंतर आम्ही आज त्या ठिकाणी दाखल झालो, असे ठाकूर म्हणाले.

Related Articles

Back to top button