ब्रेकिंग! शिंदेंचा ठाकरे गटाला तगडा झटका
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली आहे. आता सोलापूरसह अन्य भागात उद्या मतदान होणार आहे. तर शनिवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, विधानसभा मतदानाच्या एक दिवस आधी कल्याण-डोंबिवलीमध्ये मोठी घडामोड घडली आहे. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
विधानसभेच्या शेवटच्या टप्प्यात कल्याण-डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. आता ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण कल्याण-डोंबिवली हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
मात्र, गेल्या दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्याने त्याचा फटका ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. कारण कल्याण-डोंबिवलीमध्ये बहुतांश शिवसैनिक, पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीतदेखील या भागातून शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे निवडून आले आहेत.