राजकीय

ब्रेकिंग! राज्यात नवा राजकीय ड्रामा

  • राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. याच वेळी राज्याच्या राजकारणात मोठा राडा झाला. सध्या विरारमध्ये चांगलाच राजकीय ड्रामा पाहायला मिळत आहे. येथे पैसे वाटल्याच्या आरोपांवरून भाजप आणि बविआमध्ये राडा झाला आहे.
  • भाजपचे नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटले, असा आरोप बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. सोशल मीडियावर तर तावडेंचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. हे सुरु असताना दुसरीकडे आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. ज्या हाॅटेलमध्ये तावडे पकडले गेले त्याच हाॅटेलच्या एका खोलीत सात महिला सापडल्या. 
  • मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये मोठा राडा झाला. निवडणुकीला काही तास बाकी असताना तावडे पैसे वाटताना सापडले. विरार येथील विवांत हाॅटेलमध्ये हा सगळा प्रकार घडला. त्यानंतर बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हजेरी लावली.
  • दरम्यान, यावेळी हॉटेल विवांतमध्ये क्षितीज ठाकूर यांनी कार्यकर्ते, पोलिसांसह हॉटेलच्या काही रुमची झडती घेतली. त्याच वेळी सात महिला आढळून आल्याने खळबळ उडाली. या महिलांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपण सगळे एका ग्रुपने आलो असल्याचे सांगितले. आपण एका व्यक्तीसोबत आलो असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. या सगळ्या महिला विविध वयोगटातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button