खेळ

ब्रेकिंग! विराट-रोहित पुन्हा मोक्याच्या क्षणी फ्लॉप

  • गेल्या काही काळापासून भारतीय कर्णधार रोहित शर्माचा कसोटी फार्म खूपच खराब आहे. एकीकडे त्याच्या नेतृत्वाखाली संघाला सतत पराभवाचा सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे तो फलंदाजीतही अपयशी होत आहे. टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध मालिकेने आपल्या कसोटी हंगामाला सुरुवात केली, मात्र तेव्हापासून रोहित सतत धावांसाठी झगडताना दिसतोय. त्याचा खराब फॉर्म ऑस्ट्रेलियातही जारी राहिला.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीच्या अखेरच्या दिवशी रोहितकडून टीम इंडिया चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. रोहितकडे तशी संधी देखील होती. अखेरच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 340 धावांची आवश्यकता आहे. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित सलामीला येऊन महत्त्वाचे योगदान देईल, असे चाहत्यांना वाटत होते. रोहित काही काळ क्रिजवर टीकून राहण्यात यशस्वी देखील ठरला. मात्र अखेर कांगारु कर्णधार पॅट कमिन्सने त्याची विकेट घेतली. रोहित 40 चेंडूत 9 धावा करून बाद झाला.
  • रोहित बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. अनेकांनी रोहितवर टीका करत त्याला कसोटी क्रिकेट सोडण्याचा सल्ला दिला.
  • तसेच विराट कोहली मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावात देखील फ्लॉप झाला. त्याने पहिल्या डावात बराच संयम दाखवला होता. मात्र दुसऱ्या डावात तो पुन्हा एकदा ऑफ स्टंप बाहेरील चेंडू खेळण्याच्या नादात बाद झाला. कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 340 धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना कोहली 29 चेंडूत केवळ 5 धावा करून बाद झाला.

Related Articles

Back to top button