शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारा जवळ हा अपघात झाला. अपघात घडला तेव्हा खासदार वायकर हे गाडीतच होते. टेम्पोचालकाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झाले का, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. रविवारी मध्यरात्री वायकर यांच्या कारचा अपघात झाला. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली.
आयशर टेम्पो आणि वायकरांच्या गाडीची रविवारी मध्यरात्री धडक झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. या प्रकरणी आता चौकशी केली जात आहे. ज्या टेम्पोने वायकर यांच्या कारला धडक दिली त्याचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे.