क्राईम

ब्रेकिंग! बीड प्रकरणात नवा ट्विस्ट

  • सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. वीस पेक्षा जास्त दिवस होऊनही या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांना सापडले नाहीत. या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. तसेच इतर आरोपी फरार आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला होता. 
  • परंतु हा दावा चुकीचा असल्याचे बीड पोलिसांनी म्हटले आहे. तसेच आरोपीचा शोध कार्यास अडथळा येईल किंवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशा प्रकारची माहिती किंवा कॉमेंट करू नये, अशा देखील सूचना पोलिसांनी केल्या आहेत.
  • बीड पोलिसांनी अंजली दमानिया यांच्या दाव्यानंतर पत्रक काढले आहे. त्यात म्हटले की, फरार आरोपींच्या मृत्यू संदर्भात दमानिया यांनी केलेला दावा चुकीचा आहे. एका व्हॉइस मेसेजचा हवाला देत दमानिया यांनी फरार आरोपींचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. मात्र बसवकल्याण येथे असा कोणताही प्रकार घडला नसल्याची बीड पोलिसांनी म्हटले आहे.
  • दमानिया यांना ज्या व्यक्तीने तो व्हाईस मेसेज पाठवला तो दारूच्या नशेत होता. त्या नशेत त्याने तो मेसेज पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणत्याही माहिती असल्यास प्रथम पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

Related Articles

Back to top button