मनोरंजन
सुरेश धसांनी नाव घेतले, प्राजक्ता माळी संतापली
- आमदार सुरेश धस यांनी नुकतच अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख केल्याने एकच खळबळ माजली आहे. आमदार धस हे सध्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करुन त्यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत.
- नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अभिनेत्रींचा उल्लेख केला. त्यामध्ये प्राजक्ताचेही नाव घेतले. हे संपूर्ण प्रकरण आता चांगलेच तापले आहे. कारण या प्रकरणी एकीकडे मनसे नेता अमेय खोपकर यांची एन्ट्री झाली आहार तर दुसरीकडे मात्र प्राजक्ता हिने महिला आयोगात जाण्याचे सांगितले आहे. दरम्यान प्राजक्ता ही धस यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार करणार आहे.