खेळ
ब्रेकिंग! लढला, भिडला, एकटा उभा ठाकला

- टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्यात भारतीय संघातील युवा खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याने आज शतकी खेळी केली आहे. विशेष म्हणजे आठव्या स्थानावर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या रेड्डी याने ऑस्ट्रेलियासमोर शतक ठोकले.
- नितेशच्या या शतकी खेळीमुळे संपूर्ण क्रिकेटविश्वातून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. रेड्डीने 171 चेंडूत शतक पूर्ण केले आहे.
- ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ काल पावसामुळे थांबला, तेव्हा भारताने 9 गडी गमवून 358 धावा केल्या होत्या.
- पण आज फलंदाजीसाठी आलेला रुषभ पंत 191 धावा करत बाद झाला. त्यानंतर रेड्डी फलंदाजीसाठी मैदानात आला. सुरूवातीला सावध खेळी करत नितीशने संघाची धुरा सांभाळली. पण काहीवेळाने ऑस्ट्रेलियांच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार रेड्डीने घेतला.
- आठव्या विकेटसाठी रेड्डीने वॉशिंग्टन सुंदर सोबत चांगली भागीदारी केली आणि भारतीय क्रीडाप्रेमींच्या जीवात जीव आला. रेड्डी याने शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर इतिहास रचला आहे. आठव्या किंवा त्याखालील क्रमांकावर खेळताना ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
- आज खेळ संपला तेव्हा भारताने 9 गडी गमवून 358 धावा केल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी नाबाद 105, तर मोहम्मद सिराज नाबाद 2 धावांवर खेळत आहे. खराब प्रकाशमानामुळे पंचांना सामना लवकर थांबवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ऑस्ट्रेलियाकडे अजूनही 116 धावांची आघाडी आहे. ही आघाडी उद्या काही धावांनी कमी होऊ शकते.



