महाराष्ट्र
ब्रेकिंग! शरद पवार गोंधळले…

- विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. तर महायुतीला मोठे यश मिळाले आहे. त्यावरून महाविकास आघाडीकडून इव्हीएमवर शंका उपस्थित केल्या जात आहे. त्यात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) प्रमुख शरद पवार यांनीही भाजपवर टीका केली. राज्यातील निवडणुकीत पक्षांना मिळालेली मते आणि मिळालेल्या जागांवर त्यांनी काही शंका उपस्थित केल्या. मोठ्या राज्यात भाजपला सत्ता मिळत आहे. तर लहान राज्यात विरोधकांनी सत्ता दिली जात आहे, अशी टीका पवार यांनी कोल्हापूर येथे केली. या निवडणुकीतील आकडे आश्चर्यकारक आहे. पण ठोस अशी माहिती नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही, अशी पुष्टीही पवार यांनी जोडली आहे.
- पवार म्हणाले, अधिकृत माहिती नसल्याने ईव्हीएम भाष्य करणे योग्य नाही. लोकसभेनंतर चार निवडणुका झाल्या आहेत. हरियाणामध्ये भाजपची अवस्था कठीण होती. पण भाजप सत्तेवर आली आहे. त्याच इव्हीएमवर जम्मू काश्मीर फारुक अब्दुला पक्षाला सत्ता मिळालेली आहे. महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर झाली आहे. भाजपला यश आले आहे. याचवेळी झारखंडला भाजपचा पराभव झाला आहे. याबाबत सत्ताधारी पक्ष सांगू शकतात. ईव्हीएमचा संबंध नाही.