बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाने गदारोळ सुरू आहे. याचे कारण म्हणजे छत्तीसगड सरकारची महतारी वंदना योजना, ज्याअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा एक हजार रुपये जमा केले जातात. या योजनेअंतर्गत सनीच्या नावाने तयार करण्यात आलेल्या खात्यात दरमहा एक हजार रुपये पाठवले जात आहेत. या प्रकरणावरून राजकारण तापले असून या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. दरम्यान, सनीच्या नावाने दरमहा पैसे घेणारी व्यक्ती सापडली आहे.
वीरेंद्र जोशी असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने सनीच्या नावाने खाते उघडले आणि चालवले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत असून लाभार्थ्यांच्या पडताळणीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.
बस्तरमधील तलूर गावात हा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकारी हॅरिस एस यांनी महिला व बालविकास विभागाला या प्रकरणाची चौकशी करून बँक खाते गोठविण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून पैसे वसूल करता येतील.