देश - विदेश
ब्रेकिंग! सिने विश्व् हादरले
- प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे आज सोमवारी सायंकाळी निधन झाले आहे. अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या श्याम बेनेगल यांनी 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
- श्याम बेनेगल यांनी 14 डिसेंबर रोजी त्यांचा 90 वा वाढदिवस मित्र आणि कुटुंबासह साजरा केला. बेनेगल यांच्या वाढदिवसाला अभिनेते कुलभूषण खरबंदा, नसीरुद्दीन शाह, दिव्या दत्ता, शबाना आझमी, रजित कपूर, अतुल तिवारी, चित्रपट निर्माता-अभिनेता व शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर आणि इतर अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. मात्र श्यान बेनेगल हे किडनीशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांची मुलगी पिया बेनेगल हिने एका इंग्रजी वृत्तसंस्थेशी बोलताना दुजोरा दिला आहे. यावेळी तिने असेही म्हटले की, एक दिवस ही गोष्ट घडणार होती. बेनेगल यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांना भारत सरकारने 1976 मध्ये पद्मश्री आणि 1991 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या यशस्वी चित्रपटांमध्ये मंथन, जुबैदा आणि सरदारी बेगम यांचा समावेश आहे.