ब्रेकिंग! प्रणिती शिंदेच्या टीकेला भाजपने दिले खास शैलीत प्रत्युत्तर
अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळविला. महायुतीच्या या विषयात लाडकी बहीण योजनेचा वाटा मोलाचा ठरला. सध्या सोलापूरसह अन्य भागात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, लाडकी बहीण आता सावत्र झाली का? हा चुनावी जुमला होता, हेच आता समोर आले आहे.
सोलापूरला मंत्रीपद मिळाले नाही, ही शोकांतिका आहे. भाजपचे इथले नेतृत्व सक्षम काम करत नाही. म्हणून कदाचित सोलापूरला मंत्रिपद मिळाले नसावे. पण, लक्षात ठेवा मी सोलापूरची खासदार आहे. नोटबंदी सारखे निर्णय हे असंविधानिक होते. भाजपच्या काळात अघोषित आणीबाणी आहे, अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी काल भाजपवर टीका केली होती. यावर आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.
लाडकी बहीण सावत्र नाही तर जिवाची झाली असून डिसेंबर अखेर नावे पैसे पडणार आहेत. खासदार प्रणिती शिंदे यांचा केवळ प्रसिध्दी झोतात राहण्यासाठी राजकिय खटाटोप चालू असतो. महायुती सरकारने दिलेले वचन पूर्ण करणार असून ज्या लाडक्या बहिणीला पैसे देवू नका, म्हूणन प्रणितीताईचा पक्ष कोर्टात गेला. त्या काँग्रेसवाल्यांना लाडक्या बहिणीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे प्रत्युत्तर भाजपने प्रणिती शिंदेच्या टीकेला दिले आहे.