लाडक्या बहिणींना पुन्हा लॉटरी!
अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळविला. महायुतीच्या या विषयात लाडकी बहीण योजनेचा वाटा मोलाचा ठरला. सध्या सोलापूरसह अन्य भागात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, नवे सरकार सत्तेत येताच केंद्राकडून राज्याला जबरदस्त गिफ्ट मिळाले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एकाच वर्षात महाराष्ट्रासाठी तब्बल वीस लाख घरांना मंजुरी मिळाली आहे. याबाबत केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांनी घोषणा केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. एकाच वर्षात तब्बल वीस लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, याचा लाभ जे जे बेघर आहेत, त्या सर्वांना मिळेल. विशेषतः लाडका शेतकरी आणि लाडक्या बहिणींना या घराचा लाभ मिळून देण्याचा प्रयत्न असेल, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना हक्काच्या पैशांसोबतच हक्काचे स्वत:चे घर देखील मिळणार आहे.