क्राईम
ट्विस्ट; सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली
- पोलिसांनीच न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली. सोमनाथ हे दलित असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला. राहुल गांधींनी आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना हा आरोप केला.
- सोमनाथ यांचा कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राहुल हे सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी परभणीत दाखल झाले होते. त्यांनी दुपारी सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणात प्रत्यक्षात काय घडले आणि आतापर्यंत काय कारवाई झाली याची माहिती राहुल यांनी घेतली. यावेळी सोमनाथच्या आईने टाहो फोडत माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी राहुल यांच्याकडे केली. राहुल यांनी सुर्यवंशी कुटुंबियांसोबत अर्धा तास चर्चा केली.
- सोमनाथ यांची हत्या पोलिसांनी केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून हे स्पष्ट झाले की, शंभर टक्के ही हत्या आहे. सोमनाथ यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. सोमनाथ यांना न्याय मिळावा. पोलिसांनीच न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ यांची हत्या केली. सोमनाथ हे दलित असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप करत या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. या प्रकरणात राजकारण नको, तर न्याय हवा, असे राहुल गांधी म्हणाले.