आरोग्य
ब्रेकिंग! राज्यात थंडीची लाट, पालकांनो… जर हिवाळ्यात मुलांना ताप येत असेल, तर…
- हिवाळ्यात वातावरण बदलाचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलांवर होतो. लहान मुलांची रोगप्रतिकरक शक्ति कमी असल्यामुळे ते लगेच हंगामी आजाराला बळी पडतात.
- त्यामुळे या हंगामात लहान मुलांना सर्दी खोकला आणि ताप येणे सामान्य आहे. यादरम्यान योग्य काळजी घेतल्यास मुले बरे देखील होऊ शकतात. पण, जेव्हा मुले आजारी पडतात किंवा ताप येतो तेव्हा पालक अनेकदा अनेक चुका करतात ज्यामुळे त्यांच्या मुलांच्या आरोग्यावर त्याचा अजून वाईट परिणाम होतो. चला जाणून घेऊया या चुका-
- लहान मुले अनेकदा आजारी पडतात. त्यांना ताप आला की आई वडिलांची काळजी वाढते. मग अशावेळी, मुलांचा ताप घालवण्यासाठी पालक काही चुकीच्या गोष्टी करतात, ज्यामुळे मुलांच्या आरोग्य समस्या आणखीन वाढू शकतात. तर त्या चुका तुम्ही देखील करत नाही ना? चला तर मग जाणून घेऊया, मूल आजारी पडल्यावर कोणत्या गोष्टी करू नयेत. मुलांना ताप आल्यानंतर अनेक पालक काळजीपोटी काही घरगुती उपाय करतात. जसे की, त्यांना गरम सूप प्यायला देणे, त्यांच्या अंगावर जाड पांघरुण घालून दरदरुन घाम फुटेपर्यंत त्यांना झोपायला लावणे आणि बरेच काही. तर या गोष्टी मुलांना आणखीनच आजारी पाडू शकतात. जसे की-
- आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मुलांना गरम किंवा थंड वस्तू खायला दिल्याने त्यांच्या शरीराच्या एकूण तापमानावर कोणताही परिणाम होत नाही
- पालक आपल्या मुलांना ताप आल्यावर आंघोळ घालणे टाळतात, जरी असे केल्याने त्यांचा ताप कमी होत नाही. या काळात मुलांना कोमट पाण्याने आंघोळ घालावी. किमान त्यांचे अंग तरी पुसून घ्यावे, यामुळे त्यांची स्वच्छता पातळी देखील राखली जाईल.
- ताप आल्यास अनेकदा लोक स्वेच्छेने मुलाला औषध देतात, जे मुलासाठी धोकादायक ठरू शकते. अनेक वेळा ताप येऊनही मुलांच्या शरीराला प्रतिजैविकांची गरज नसते. त्यामुळे ताप आला म्हणून लगेच त्यांना प्रतिजैविक औषधे देऊ नये. त्यांना ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जावे.
- मुलांना ताप आल्यावर पालक त्यांना भरपूर कपडे घालायला लावतात. त्यामुळे त्यांच्या शरीरातील उष्णता बाहेर पडू शकत नाही आणि खूप कपडे घातल्याने त्यांची तब्येत आणखी बिघडू शकते.
- मुलांना तापाचे औषध देण्यापूर्वी पालकांनी त्यांचे तापमान तपासायला हवे. काही पालक मुलांना हलका ताप आला म्हणून औषध देऊन शाळेत पाठवतात. पण असे केल्याने इतर मुलांनाही संसर्ग होऊ शकतो आणि मुलांना शाळेत पाठवल्याने त्यांची प्रकृती आणखी बिघडू शकते.