महाराष्ट्र

ब्रेकिंग! शरद पवार गटात वादळापूर्वीची शांतता

  • महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. अधिवेशनाला सुरुवात झाली मात्र मंत्र्यांना अजून खातेवाटत झालेले नाही. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे महायुतीमध्ये अनेक नेते नाराज आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही सर्वकाही आलबेल नाही. विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीच राहिलेली नाही, असा टोला शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी लगावला आहे. शरद पवार गटात वादळापूर्वीची शांतता आहे. अधिवेशन संपेपर्यंत बघा काय घडते, असे म्हणत शिरसाट यांनी महाविकास आघाडीत काहीही आलबेल नसल्याचे म्हटले आहे.
  • हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. शिरसाट यांनी विधान भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडी आता राहिलेली नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्याच घटक पक्षाच्या उमेदवारांना पाडण्याचे काम केले आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला आहे. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांचा चेहराही पाहायला तयार नाही. नाना पटोले ठाकरे गटाच्या नेत्यांना भेटायला तयार नाहीत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, शरद पवार हे अधिवेशन संपेपर्यंत काय निर्णय घेतील हे देखील सांगता येत नाही, असेही ते म्हणाले.

Related Articles

Back to top button