हवामान

ब्रेकिंग! राज्यात ‘या’ तारखेपासून थंडी आणखी वाढणार?

  • राज्यात सध्या थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. कारण उत्तरेकडून वायव्येच्या दिशेला येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील सर्वच भागात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. तसेच उत्तरी राज्यांच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये होणारी हिमवृष्टी आणि तापमान घट या सर्व बदलांचा परिणाम देशाच्या उर्वरित राज्यांच्या हवामानावर मोठ्या प्रमाणात होत आहे.
  • उत्तरेकडून येणाऱ्या या शीतलहरींमुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र प्रचंड प्रमाणात गारठला आहे. तसेच राज्यातील किमान आणि कमाल तापमानात देखील काही प्रमाणात बदल होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
  • याशिवाय गेल्या 48 तासांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने देशातील दक्षिण किनारपट्टी व क्षेत्र प्रभावित होण्यासमवेत महाराष्ट्रावर देखील पावसाचे सावट आहे.
  • हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 15 डिसेंबरपासून राज्यात गारठा वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी देखील वाढत्या योग्य काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button