क्राईम
ब्रेकिंग! त्या हत्या प्रकरणात कन्नड अभिनेता दर्शनला…
- रेणुका स्वामी हत्या प्रकरणात अभिनेता दर्शन थुगुडेपा याला जामीन मिळाला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने अभिनेत्याला जामीन मंजूर केला आहे. दर्शनशिवाय श्रीनिवास, पवित्रा गौडा यांच्यासह अन्य सह आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
- न्यायालयाच्या आदेशानंतर हे सर्व आरोपी लवकरच कारागृहातून बाहेर येणार आहेत. मात्र, रेणुकास्वामी खून प्रकरणातील सर्व आरोपींच्या भूमिकेबाबत तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरूच राहणार आहे.
- गेल्या जूनमध्ये 33 वर्षीय ऑटो चालक रेणुका स्वामी बेंगळुरूमधील फ्लायओव्हरवर मृतावस्थेत आढळून आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार रेणुका अभिनेता दर्शनचा फॅन होता. दर्शनच्या सांगण्यावरून त्याचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्याची हत्या करण्यात आली. दर्शनची मैत्रीण पवित्रा गौडा हिला त्रास देत असल्याने रेणुका स्वामीची हत्या करण्यात आली आहे.
- या प्रकरणात पोलिसांनी, अभिनेता दर्शन, त्याची मैत्रीण पवित्रासह अनेक आरोपींना अटक केली होती. रेणुका स्वामीची कथित हत्या बंगळुरू पट्टांगेरे गावात झाली. रेणुका याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर दर्शनला त्याच्या व्हॉट्सॲपवर रेणुकाच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सर्वजण कामाक्षिपल्य येथे पोहोचले आणि तेथे रेणुका याचा मृतदेह नाल्याजवळ फेकून देण्यात आला.