सोलापूर

ब्रेकिंग! सोलापूर शहरात मोठी खळबळ

  • सोलापूर (प्रतिनिधी) शहरात दिवसेंदिवस मुले आणि महिला बेपत्ता होण्याच्या तक्रारीत वाढतच होत आहे. शुक्रवारी शहरातील ३ पोलीस ठाण्यात मुले आणि बेपत्ता महिला बेपत्ता होण्याच्या ७ नोंदी नोंदवण्यात आले आहेत. 
  • साक्षी ज्ञानेश्वर चौगुले (वय-१९, रा. सायली हाइट्स वसंत विहार, सोलापूर) ही मुलगी ११ डिसेंबर रोजी घरातून निघून गेली आहे. रणधीर उर्जतसिंग निंबाळकर (वय-२१,रा.अवंती नगर, वीर गणपती जवळ सोलापूर) हा २१ वर्षाचा तरुण ११ डिसेंबर रोजी आई सोबत वाद-विवाद झाल्याने घरातून निघून गेला आहे. प्रतीक्षा उत्तम रोकडे (वय-२३, रा.नाकोडा युनिटी सोलापूर) ही महिला १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता राहत्या घरातून निघून गेली आहे. या तिन्ही घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली आहे. तर सचिन महादेव कटके (वय-४५, रा.भवानी पेठ, सोलापूर) हा इसम घरात कुणालाही काय न सांगता निघून गेला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद झाली आहे. तर दिव्या गणेश मंजेरी ही मुलगी आजी घरी असताना निघून गेली आहे. तर राजशेखर धुळाप्पा वच्चे (वय-४६) हा इसम ८ डिसेंबर रोजी घरासमोरील शेजाऱ्याकडे चावी ठेवून निघून गेले आहेत. या दोन्ही घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.

Related Articles

Back to top button