मनोरंजन

ब्रेकिंग! झुकेगा नही साला

  • ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनला आज तेलंगणा पोलिसांनी अटक केली होती. हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणीच अल्लू अर्जुनलाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 
  • त्याला आधी नामपल्ली कोर्टाने १४ दिवसांची कोठडी सुनावली होती. यानंतर त्याने हायकोर्टात धाव घेतली. आता ‘पुष्पा’ला दिलासा मिळाला आहे. तेलंगणा हायकोर्टाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यामुळे आता ‘पुष्पा’ च्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. 
  • हा निर्णय देताना न्यायाधीश म्हणाले, कुटुंबाप्रती आम्हाला सहानुभूती आहे. पण, तो (अल्लू अर्जून) अभिनेता आहे. त्याला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही. नागरिक म्हणून त्यालाही जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार आहे.

Related Articles

Back to top button